प्रेमी सोबत असतांना रुपा घेत नव्हती पतीचे फोन!– चाकूने सागरला भोसकून संपवला प्रेमाचा त्रिकोण!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): ब्युटी पॉर्लर चालवणारी रुपा (काल्पनिक नाव) नावाप्रमाणेच रुपवान होती. जळगाव शहराच्या समता नगर या तळागाळातील जनतेच्या रहिवासी भागात ती आपल्या पती व मुलासह रहात होती. आपल्या सर्व हौसमौज पुर्ण करणारा, चांगला पगार असणारा नोकरदार पती असावा अशी तिची इच्छा आणि मनातील स्वप्न होते. मात्र तिचे स्वप्न हव्या त्या प्रमाणात काही पुर्ण झाले नव्हते. ब्युटी पॉर्लरची किरकोळ कामे करुन ती कमी अधिक प्रमाणात आपला घरखर्च भागवत होती. तिच्या संसार वेलीवर एका पुत्ररत्नाचा देखील सहभाग होता. हम दो हमारा एक अशा त्रिकोणी कुटूंबाची आधारस्तंभ असलेली रुपा दिसायला देखणी होती. आपल्या पतीने आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पुर्ण कराव्या असे तिला वाटत होते. मात्र मजुरी करणा-या तिच्या पतीचे जेमतेम उत्पन्न तिच्या गरजा आणि हौसमौज पुर्ण करण्यास कमी पडत होते. त्यामुळे तिच्या सर्व प्रकारच्या इच्छेची पातळी बरीच खालावली होती.

रुपा रहात असलेल्या घराजवळच सागर नरेंद्र पवार हा अविवाहीत तरुण रहात होता. सागर हा देखील दिसायला देखणा तरुण होता. त्याच्या मनात विवाहीत रुपा भरली होती. चोरट्या नजरेचा कटाक्ष  तो रुपाच्या दिशेने टाकत होता. आपल्यावर अविवाहीत सागरची चोरटी नजर जीव ओवाळून पडत असल्याचे एव्हाना तिच्या लक्षात आले होते. ती विवाहीत असल्यामुळे त्याच्यापेक्षा सर्वच बाबतीत अनुभवी होती. एखाद्या राजपुत्राप्रमाणे सागरचे राहणीमान होते. त्याच्या पोटावरील सिक्स पॅक एकदा रुपाने लपून पाहिले होते. त्याचे सिक्स पॅक त्याच्या प्रेमात आणि मोहात पडण्यास रुपाला  देखील वेळ लागला नाही. सागरचे बाहू दणकट होते. पतीपेक्षा रुपाला सागर जवळचा आणि उजवा वाटत होता. सागरसोबत सागर किनारी भेळभत्ता खाण्याचा आनंद लुटत असल्याचे तिला कधी कधी स्वप्न पडत होते. सागर सोबत सागर किनारी हातात हात आणि गळ्यात गळा घालून फिरत असल्याचे देखील तिला कधी कधी दिवसादेखील स्वप्न पडत होते. सागर हा एका खासगी मोबाईल कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे टू व्हिलर आणि महागडा अ‍ॅंड्रॉईड मोबाईल होता. त्याची राहण्याची आणि वागण्याची शान आणि मनमोहक चोरटी नजर बघून तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेमाचा अंकुर फुलण्यास वेळ लागला नाही. तो आपल्यावर जीव ओवाळून टाकत असल्याचे तिच्या पारखी नजरेने कधीच ओळखून घेतले होते.

mayat sagar pawar

रुपा एक विवाहीता होती. तिचा पती हेच तिचे सर्वस्व होते. पतीरुपी कुंपनात तिने राहणे क्रमप्राप्त होते.  मात्र असे असले तरी कळत – नकळत ती अविवाहीत सागरच्या प्रेमात पडली आणि आकंठ बुडाली देखील. सागर आपल्या सर्व प्रकारच्या गरजा आणि हौसमौज पुर्ण करु शकतो याची तिला आशा नाहीतर पक्की खात्री होती. या पक्क्या खात्रीच्या बळावर ती त्याच्या नजरेला आपल्या लालचुटूक, नाजूक ओठांच्या बळावर कधी हसून तर कधी स्माईल करुन त्याला उच्च प्रतीचा प्रतिसाद देऊ लागली. आपल्या श्रमाला फळ आल्याचे सागरला मनोमन जाणवले. त्यामुळे तो सुखावला आणि त्याच्या चेह-यावर समाधानाची एक लकेर उमटली.

सागर कामावरुन आला का? सागर कामावर गेला का? याची ती दररोज पाहणी करत होती. काही वर्षापुर्वी कामानिमीत्त पतीसोबत परगावी गेलेली रुपा लॉकडाऊन काळात पुन्हा जळगावला राहण्यास आली होती. लॉकडाऊन काळापासून इकडे रुपाचा आणि सागरच्या प्रेमाचा चांगलाच जम बसला होता. दोघे एकाच समाजाचे होते. सुरुवातीला केवळ नजरेच्या अ‍ॅक्सेसवर चालणारे त्यांचे प्रेम नंतर प्रत्यक्ष संवादात परावर्तीत झाले. सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत प्रेमाचा इजहार कसा करु, तिच्यासोबत काय बोलू, कसे बोलू या विचारात त्याने काही दिवस असेच घालवले होते. नंतर एके दिवशी मनाची हिम्मत करत त्याने तिला “माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे एका दमात सांगूनच टाकले. त्याच्या हिमतीची दाद देत त्याच्या प्रेमाचा स्विकार असल्याचे तिने देखील त्याला सांगून आपले मन मोकळे करुनच घेतले.

दिवसेंदिवस सागरच्या कामाचा व्याप वाढत होता. कामाच्या व्यापातून होणारा शारीरीक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी सागर कमी अधिक प्रमाणात मद्यप्राशन करु लागला. सागर मद्यप्राशन करत असल्याचे समजताच रुपा त्याच्यावर लाडीकपणे नाराज झाली. “तु मद्यपान सोड, नाहीतर मी तुला सोडते” असे तिने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला प्रेमाने सांगितले. सोबत त्याच्या गालावर तिने एक चुपकी देखील दिली. तिचा हा अंदाज त्याला खुप आवडला. तिच्या आवाहनाला त्याने शुन्य मिनीटात प्रतिसाद दिला. या सुर्य – चंद्राला आणी तुला साक्षी ठेऊन या क्षणापासून मद्यपान सोडत असल्याचे त्याने तिला वचन दिले. त्याचा हा अंदाज तिला खुप आवडला. खरोखरच त्याने मद्यपान सोडून दिले. आपल्या एका शब्दावर सागरने मद्यपान सोडल्याचे लक्षात येताच ती त्याच्यावर दुपटीने प्रेम करु लागली. सागरची वागणूक चांगली असल्याचे तिला अनेकांकडून समजले होते.

आता दोघे मोबाईलवर चोरुन लपून बोलत होते. आपली पत्नी चोरुन लपून घराजवळ राहणा-या सागरसोबत बोलत असल्याचे तिच्या पतीच्या लक्षात आले होते. त्यामुळे दोघा पती पत्नीत बेबनाव सुरु झाला. तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पतीपेक्षा तिला सागर जवळचा वाटत होता. पतीपेक्षा सागरकडून तिला सर्वच प्रकारचे सुख मिळत होते. तिचा पती आर्थिक बाबतीत टंचाईग्रस्त होता. याउलट सागर आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम होता. रुपाचा पती तिला मानसिक त्रास देत होता. याउलट सागर तिला अथांग सागराप्रमाणे भरभरुन सुख देत होता. त्याच्या एका आवाजानेच तिला हायसे वाटत होते. तुलनात्मकदृष्ट्या तिला सागरच उजवा वाटत असल्यामुळे ती साहजीकच सागरकडे ओढली गेली होती. शिवाय ती तिशीच्या आतील रसरशित बांध्याची एकदम तरुण विवाहीता होती.

पतीच्या रोजच्या त्रासाला वैतागून 25 मार्च रोजी भर दुपारच्या वेळी तीने आपले कपडे बॅगेत भरले. कपड्याने भरलेली बॅग आणि मुलासह ती सागरच्या घरी राहण्यास निघून आली. लग्नापुर्वीच सिने अभिनेत्री करिना कपूर कपड्यांची बॅग भरुन सैफ अलीच्या घरी बेधडक राहण्यास निघून आली होती. कमी अधिक प्रमाणात त्याच धर्तीवर रुपादेखील कपड्यांची बॅग भरुन सागरकडे पतीच्या गैरहजेरीत गुपचूप राहण्यास निघून आली. त्या रात्री तिचा पती रोजंदारीचे काम आटोपून घरी परत आला असता त्याला पत्नी रुपा गैरहजर दिसली. त्यामुळे त्याने तिला फोन लावण्यास सुरुवात केली. रात्री अकरा वाजेपासून त्याने तिला खुप वेळा फोन केले. मात्र सागरच्या बाहुपाशात विसावलेली रुपा त्याच्या कॉलला अजिबात प्रतिसाद देत नव्हती. फोन उचलत नसल्याचे बघून तिच्या पतीने तिला मेसेज पाठवण्याचा धडाका लावला. तिने त्याच्या मेसेजला देखील प्रतिसाद दिला नाही. आपली पत्नी आपल्याला सोडून कुठे गेली असेल या प्रश्नाने तो हैरान झाला होता. बेचैन झालेल्या रुपाच्या पतीने वैतागून आपण आता आत्महत्या करत असल्याचा मेसेज तिला पाठवला. सारखे सारखे फोन आणि मेसेजमुळे ती देखील इकडे सागरकडे असतांना वैतागली होती.

Rohidas gabhale API

आपला पती आत्महत्या करत असल्याचा मेसेज वाचून तिने सागरला याबाबत कल्पना दिली. त्यावेळी रात्रीचे दोन वाजले होते. दोघांच्या शैय्यासोबततीत या फोनमुळे वारंवार अडथळा येत होता. अखेर सागरसोबत चर्चा करुन तिने तिच्या पतीचा फोन उचलला. मी सागरकडे असल्याचे तिने त्याला फोनवर सांगताच इकडे तिच्या पतीचे डोके भडकले. एवढ्या मध्यरात्री आपली पत्नी सागरच्या घरात अर्थात त्याच्या बाहुपाशात असल्याची त्याला कल्पना आली होती. अगोदरच भडकलेला रुपाचा पती आपली पत्नी सागरच्या घरात असल्याचे समजल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात भडकला. त्याने तात्काळ सागरचे घर गाठले. सागरच्या घरात येताच त्याने पत्नी रुपाला अगोदर फैलावर घेतले. मी सागरसोबत लग्न करणार आहे असे रुपाने चिडलेल्या पतीला लागलीच सुनावले. पत्नी रुपाचे उत्तर ऐकून तिच्या पतीच्या रागाचा पारा सर्रकन सर्वोच्च पातळीवर चढला. त्याने संतापाच्या भरात आपला मुलगा कुठे आहे म्हणून सागरच्या घरात शोधाशोध सुरु केली. दरम्यान चिडलेल्या रुपाच्या पतीने सागरसोबत शाब्दिक बाचाबाची सुरु केली. आता या शाब्दिक बाचाबाचीचे लवकरच हाणामारीत रुपांतर होण्यास अजिबात वेळ लागणार नाही हे रुपाने ओळखले होते. तिचा पती सागरच्या अंगावर धावून जाताच ती दोघांमधे आडवी आली. सागरला मारायचे नाही असे म्हणत तिने पतीला विनवणीच्या सुरात विरोध सुरु केला. रुपाला सागरचा कळवळा आला होता. तिला सागरचा जीव प्यारा होता.

एवढ्या रात्री सागरच्या घरात सुरु असलेल्या गोंधळामुळे बाहेर गल्लीतील रहिवाशांची झोप उडाली. जवळच राहणारा सागरचा मामेभाऊ किरण दादाराव अडकमोल हा देखील जागा झाला. आतेभाऊ सागरच्या घरातून आवाज येत असल्याचे बघून किरणने त्याच्या घराच्या दिशेने मार्गक्रमन केले. त्याच्या पाठोपाठ त्याचे वडील दादाराव अडकमोल हे देखील आले. किरण अडकमोल याने सागरच्या घरात जाऊन पाहिले असता रुपा ही तिचा पती आणी प्रियकर सागरच्या मधे उभी होती. सागरला मारु नका असे म्हणत ती पतीला विनवणी करत होती. दोघांचा वाद सोडवण्यासाठी किरण घटनास्थळावर जाण्यापुर्वीच रुपाच्या पतीने सागरवर त्याच्याकडील चाकूने वार केले. सागरच्या मानेवर चाकूचे घाव बसल्यामुळे तो जमीनीवर कोसळला होता. घटनास्थळावर सागरचा मामेभाऊ आल्याचे बघून रुपाचा पती घटनास्थळावरुन पळून गेला. त्याला पकडण्यासाठी गल्लीतील लोक त्याच्यामागे धावले. मात्र तो पलायन करण्यात यशस्वी झाला.

जखमी सागरला गल्लीतील नागरिकांनी उचलून मोटारसायकलने सामान्य रुग्णालयात आणले. जखमी सागरवर उपचार सुरु करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान सकाळी साडेपाच वाजता सागरची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच समता नगर भागात तणाव निर्माण झाला. आरपीआय तथा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी यशस्वी मध्यस्ती करत दोन्ही बाजुच्या मंडळींना शांतपणे समजावले. कुणीही कायदा हातात घेऊ नका असे त्यांनी उपस्थितांना समजावल्याने वातावरण शांत होण्यास मदत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून रामानंद नगर पोलिसांनी देखील जमावाची समजूत घातली. घटनास्थळासह रुग्णालयात पोलिसांनी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. घटनेची माहिती लक्षात  आल्यानंतर पोलिस पथक फरार संशयीताच्या शोधार्थ रवाना झाले होते.

या घटनेप्रकरणी मयत सागर पवार याचा मामेभाऊ किरण दादाराव अडकमोल याने दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 73/22 भा.द.वि. 302 नुसार सदर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. गुन्हा  दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले, पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख, हे.कॉ. दिपक शिरसाठ, हे.कॉ. विकास महाजन, पोलिस नाईक जितेंद्र तावडे, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, पो.कॉ. रविंद्र  चौधरी, अतुल चौधरी, प्रविण वाघ, आदींनी अवघ्या  दोन  तासात फरार संशयीताला अटक  करण्यात यश मिळवले. त्याला न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल करत गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलिसांना काढून दिले. संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत  आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहीदास गभाले व  त्यांचे सहकारी करत आहेत. (या कथेतील रुपा हे  नाव  काल्पनिक आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here