चोरीच्या मोटारसायकलसह चोरट्यास अटक

जळगाव : पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद वाटणा-या मोटार सायकल चालकास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तो मोटार सायकल चोरटा असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे त्याने कबुल केले. ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (25), रा. गोहरी ता. जामनेर ह.मु.कमल पॅराडाईस मंगल कार्यालय असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.

26 एप्रिल 2022 रोजी पोलिस नाईक किशोर पाटील व पो.कॉ. मुकेश पाटील असे दोघे पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान त्यांना ज्ञानेश्वर पाटील याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या त्याब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे त्याने कबुल केले. स्टार सिटी कंपनीच्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल आहे. पुढील तपासकामी त्याला मोटार सायकलसह जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार आनंदसिंग धर्मा पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोना किशोर पाटील, चेतन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here