बँक लुटीचा प्रयत्न करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक

जळगाव : पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र लुटीचा प्रयत्न करणा-या अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. जुबेर इकबाल तडवी (22) रा. कासली ता. जामनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 148/2022 भा.द.वि. 457, 380, 511 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्यातील संशयीत हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहीवाशी असल्याचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजले होते. संशयीत जुबेर ईकबाल तडवी हा पहुर येथील आठवडे बाजारात गेला असल्याचे समजल्यानंतर पो.नि. बकाले यांनी आपल्या पथकातील सहका-यांना पहुर येथे रवाना केले. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशीअंती व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अटक केली. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भादवि 457, 380, 511 या गुन्ह्याची देखील त्याने कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजीत अशोक जाधव, पो.कॉ. विनोद सुभाष पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here