मालेगाव येथील खूनाच्या गुन्ह्यातील संशयितास अजमेरला अटक

नाशिक : गेल्या वर्षी मालेगाव येथील इस्लामपुरा परिसरात तरुणाची हत्या करुन फरार झालेल्या संशयीतास आयशानगर पोलिसांच्या पथकाने अजमेर येथून ताब्यात घेत अटक केली आहे. अशपाक अहमद‎ रईस अहमद ऊर्फ अशपाक चोंग्या असे अटकेतील‎ संशयित आरोपीचे नाव आहे. ओळख लपवण्यासाठी तो एका चहाच्या हॉटेलवर वेटरचे काम करत होता. गुन्हा घडल्यापासून अकरा महिन्यापासून तो फरार होता.

अशपाक यास न्यायालयाने 24 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याच्या‎ रागातून अशपाक याने अनिस अहमद सईद‎ अहमद ऊर्फ अनिस अण्णा याची जुलै 2021 मधे तिक्ष्ण हत्याराने हत्या केली होती. या घटनेप्रकरणी पोलिस पथकाने संशयित मोहंमद रजा रईस‎ अहमद उर्फ शेरा, नईम अहमद जमील‎ ‎अहमद, शफिक अहमद व अब्दूल राफे‎ यांना अटक केली होती. यातील मुख्य संशयित‎ अशपाक चोंग्या मात्र फरार होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here