सिरीयल किलर लोहारविरुद्ध अजून दोन गुन्हे दाखल


जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी अटकेतील सिरिअल किलर बाळू उर्फ मुकुंदा बाबूलाल लोहार याच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला वृद्धेच्या हत्येचा गुन्हा नोंद आहे. याशिवाय अजून दोन वृद्ध महिलांची हत्या केल्याचे दोन गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. सध्या अटकेत असलेल्या मुकुदा लोहार याची पोलिस कोठडी 1 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर नव्याने दाखल गुन्ह्याच्या तपासकामी त्याला पुन्हा ताब्यात घेतले जाणार आहे. किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी (75) या वृद्धेची हत्या लोहार याने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यापुर्वी त्याने अशाच पद्धतीने एकट्या वृद्ध महिलांना हेरुन त्यांची हत्या करुन त्यांचे दागिने लुटून नेले आहेत.

सुरेश चैत्राम सुरवाडे (रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) यांनी नव्याने फिर्याद दाखल केली आहे. सुरेश सुरवाडे यांची आई द्वारकाबाई सुरवाडे यांची रुमालाने गळा आवळून त्याने हत्या केली होती. सदर हत्या त्याने 28 फेब्रुवारी 2021 रोजी विज पुरवठा खंडीत झाल्याचा गैरफायदा घेत केली होती. त्यानंतर त्याने द्वारकाबाई यांचे दागिने व पेन्शनचे पैसे चोरुन नेले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

शामकांत श्रीराम पाटील (रा.पारोळा रोड, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध अजून तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शामकांत पाटील यांची आजी रुख्माबाई कडू पाटील (रा.चौधरी वाडा, किनगाव बुद्रुक) या 19 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारच्या वेळी घरात एकट्याच होत्या. त्यावेळी बाळूने त्यांची हत्या केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन लोहार याने चोरुन नेले होते. पोलिसांच्या ताब्यात असलेला सिरीअल किलर आरोपी बाळू लोहार याला झन्नामन्ना जुगार खेळण्याचा नाद असून तो नाद पुर्ण करण्यासाठी लुटलेले पैसे व दागिने घेऊन तो चोपडा, शिरपूर व मध्य प्रदेशात जात असे. वृद्ध महिलांना तो आपले लक्ष करत असे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here