अपहरण झालेल्या बालकाच्या घातपाताची शक्यता?

जळगाव : चोपडा शहरातून अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलेल्या बालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. या बालकाच्या घातपाताची शक्यता जनतेत वर्तवली जात आहे. सदर बालक कुणाला आढळल्यास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे (02586-220333 अथवा 7774039640) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रुपेश उर्फ भु-या अमृत माळी असे बेपत्ता बालकाचे नाव आहे. त्याचे वय 13 वर्ष 7 महिने असून कुणीतरी अज्ञात इसमाने त्याला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या आईने चोपडा शहर पोलिस स्टेशनला 16 जून 2022 रोजी केली आहे. या बालकाचा अद्याप शोध लागला नसून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

रुपेश उर्फ भुऱ्या अमृत माळी हा रंगाने सावळा, उंची सुमारे 4 फुट 5 इंच, शरीराने सडपातळ, व चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे काळे साधारण, ओठ बारीक, डोक्यावर काळे मागे वळलेले केस, उजव्या हाताच्या मनगटावर ओम गोंदलेले असे त्याचे एकंदरीत वर्णन आहे. त्याह्या उजव्या हातात लोखंडी स्टीलचे कडे, अंगात गुलाबी रंगाचा ठिपक्यांचा फुल बाह्याचा शर्ट व कमरेस पोपटी रंगाची नाईट पँट त्याने बेपत्ता झाला त्यावेळी घातली होती. अशा वर्णनाचा मुलगा कुणाला आढळल्यास त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दुरध्वनी क्रमांक 02586-220333 अथवा मोबाईल क्रमांक 7774039640 यावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here