संजय राऊतांना धक्का – जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी थांबली

व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांना शिंदे -फडणवीस सरकारकडून सुखद हलका तर संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. सरकार स्थापनेनंतर काही तासातच जितेंद्र नवलानी यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

विशेष तपास अर्थात एसआयटी कडून सुरु असलेली जितेंद्र नवलानी यांची चौकशी आटोपण्यात आली आहे. जितेंद्र नवलानी यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. जितेंद्र नवलानी यांना देण्यात आलेली क्लिन चिट संजय राऊत आणि शिवसेनेसाठी एक धक्कादायक बातमी म्हटली जात आहे.

जितेंद्र नवलानी हे ईडीचे अधिकारी असल्यासारखे वावरत असून खंडणी उकळत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत केला होता. गावदेवी येथील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी नवलानी यांच्या पबवर कारवाई केल्यामुळे ते निलंबित झाले. पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर सिंह यांनी पैसे मागितल्याचा आरोप डांगे यांनी केला होता. नवलानी यांच्याविरोधात एसीबीकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या सर्व तक्रारींची एसीबीकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये नवलानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत सन 2015 ते 2021 दरम्यान सुमारे 58 कोटी 96 लाख रुपये संकलीत केल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यावेळी केला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here