दोघा चोरट्यांकडून तिन मोटार सायकल हस्तगत

जळगाव : दोघा मोटार सायकल चोरट्यांकडून जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या तिन मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा रा. भुसावळ गांधी नगर बुध्द विहारच्या मागे भुसावळ जि जळगाव व शुभम सुनिल पाटील रा. शिरपुर कन्हाळा रोड घोडेपीर बाबा जवळ भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

2 जुलै रोजी शहरातील अजिंठा चौफुली नजीक पेट्रोलींग करत असतांना गुन्हे शोध पथकाला अभिषेक आणि शुभम हे दोघे मोटार सायकलस्वार संशयीतरित्या फिरतांना आढळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे कबुल केले. सदर मोटार सायकल जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून च्नोरी केल्याचे दोघांनी कबुल केले.

अटकेतील दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी अजुन दोन मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. त्यांनी एकुण तिन मोटार सायकली पोलिस पथकाला काढून दिल्या आहेत. त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या मोटारसायकली व दिलेल्या जवाबानुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सफौ, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पोना, गणेश शिरसाळे, योगेश बारी, विकास सातदीवे, किशोर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here