रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

जळगाव : रिक्षात प्रवासी बसवून वाटेत त्यांच्याकडील पैसे व दागिने हिसकावून त्यांना खाली उतरवून देणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. पुर्वी सदर टोळीतील गुन्हेगार जळगाव शहरात अशा स्वरुपाचे गुन्हे करत होते. मात्र या गुन्हेगारांनी आता जळगाव शहराऐवजी ग्रामीण भागात आपले गुन्हे सुरु केले आहेत. प्रवाशाच्या रुपात अगोदरच रिक्षात बसून रस्त्यावरील प्रवाशांना सावजाच्या रुपात हेरुन त्यांना रिक्षात बसवून वाटेत लुटमार करण्याची पद्धत अटकेतील गुन्हेगारांची आहे.

PI Bakale

मोसीन खान उर्फ शेमडया नुरखान पठाण (28), रा. पिंप्राळा हुडको जळगाव, अरशद शेख हमीद शेख (23), रा. सुरेशदादा नगर, गेंदालाल मिल जळगाव, शेख फिरोज शेख करीम (30), रा. गेंदालाल मिल बिल्डींग नं. 28, रुम नं. 25 जळगाव, मनोज विजय अहिरे (31), रा.गेंदालाल मिल बिल्डींग नं. 29 रुम नं. 40 जळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रिक्षात बसल्यानंतर हातचलाखीने पैसे काढून घेतल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला भा.द.वि. 379, 34 नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मोसीन उर्फ शेमड्या पठाण व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहका-यांना रवाना केले. तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे मोसीन खान, अरशद शेख, शेख फिरोज, मनोज अहिरे अशा चौघांना जळगाव शहरातील डी मार्ट परिसरातून त्यांच्या ताब्यातील रिक्षासह ताब्यात घेण्यात आले. चौघांना पोलिसी हिसका दाखवल्यानंतर त्यांनी यावल व पारोळा अशा दोन्ही ठिकाणी केलेला गुन्हा कबुल केला.

यावल पोलिस स्टेशनला दाखल गु.र.न. 331/22 भा.द.वि. 379, 34 व पारोळा पोलिस स्टेशनला दाखल गु.र.न. 229/22 भा.द.वि.379 असे दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व रोख रक्कम असा एकुण 1 लाख 9 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बावीस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here