‘मातोश्री’वरील बैठकीतून खा. संजय राऊत अचानक पडले बाहेर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापासून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे पडसाद जाणून घेण्याचे या बैठकीच्या मागचे नियोजन होते.

या बैठकीला शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 गैरहजर होते. राज्यसभेवरील तिघांपैकी दोन खासदार हजर होते. जवळपास तीन तास सुरु असलेल्या बैठकीतून खासदार संजय राऊत अचानक बाहेर पडल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मूंना पाठिंबा देण्यास राऊत यांच्यासह काही खासदारांचा विरोध असल्याचे म्हटले जाते.

शिवसेनेचे 12 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांची अनुपस्थिती अपेक्षितच होती. मात्र मंडलिक, पाटील यांच्या गैरहजेरीनं मातोश्रीवरील टेन्शन वाढले आहे. उपस्थित लोकसभा खासदारांमधे गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित आदींचा समावेश होता. अनुपस्थित खासदारांमधे यवतमाळ-वाशिम – भावना गवळी, परभणी – संजय जाधव, कोल्हापूर – संजय मंडलिक, हिंगोली – हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे, रामटेक – कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर आदींचा समावेश होता. संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी हे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. अनिल देसाई दिल्ली येथे असल्यामुळे गैरहजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here