खादी ग्रामोद्योग भवनची जागा सरकार जमा करण्याचे आदेश

जळगाव : टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योग भवनची जागा सरकार जमा करण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत. सदर जागा अटी शर्थीवर सर्व सेवा समितीला वापरण्यासाठी देण्यात आली होती. खादीचा प्रचार होण्याच्या मुळ उद्देशाने अटी शर्थीवर सदर जागा सरकारकडून जिल्हा सर्व सेवा समितीला देण्यात आली होती. मात्र मुळ उद्देशाला हरताळ फासत या जागेचा सर्व सेवा समीतीकडून व्यावसायीक वापर गेल्या कित्येक वर्षापासून सुरु होता. काही वर्षापासून या जागेवर हॉटेल सुरु करण्यात आले होते. अधून मधून या जागेत कपड्यांचा सेल देखील लागत होता. या गैर प्रकाराबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी आवाज उचलला. तत्कालीन जिल्हाधिका-यांनी आदेश देवूनही तत्कालीन तहसीलदार वैशाली हिंगे यांनी चालढकल केल्यामुळे सर्व सेवा समितीला त्याचा लाभ झाला.

आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या सतत पाठपुराव्यानंतर जिल्हा सर्व सेवा समितीची जागा सरकार जमा करण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत. जळगाव शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक 2837 क्षेत्र 148.6 चौरस मिटर असे या जागेचे क्षेत्रफळ आहे. सदर जागा सरकार जमा का करण्यात येवू नये? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून 17 जानेवारी रोजी नोटीस बजावण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here