पन्नाशीच्या वेशीवर सुश्मिता, साठीच्या उंबरठ्यावर ललित;- आठ अफेअर पुर्ण झाल्यावर आता नवव्याचे काय फलीत?

सन 1994 मधे मिस युनिवर्सचा मुकुट जिंकणारी विश्वसुंदरी सुश्मिता सेन सध्या चर्चेत आली आहे. सध्या लंडन येथे पळून गेलेला उद्योगपती ललित मोदी याच्यासोबत सुश्मिताचे सुत जुळले आहे. दोघांनी सोशल मिडीयावर काही छायाचित्र देखील प्रसारीत केली आहेत. दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. आपल्या ट्विटमधे ललित मोदी याने सुश्मिताचा बेटर हाफ अर्थात अर्धांगिनी असा उल्लेख केला आहे. मात्र दुस-या ट्विट मधे आपण अजून लग्न केले नसल्याचे देखील म्हटले आहे. मात्र लवकरच लग्न होणार असल्याचे देखील म्हटले आहे.

साठीच्या उंबरठ्यावरील ललित मोदीचे पन्नाशीच्या जवळपास पोहोचलेल्या सुश्मितासोबत प्रेमप्रकरण सुरु आहे. आतापर्यंत सुश्मिता सेन हिचे विक्रम भट्ट, वसिम अक्रम, रणदीप हुडा, ऋतिक भसिन, मुद्दसर अजीज, बंटी सचदेव, संजय नारंग आणि सर्वात शेवटी रोहमन शॉल एवढ्या जणांसोबत तिचे नाव जोडले गेले आहे. सर्वात शेवटी असलेला रोहमन शॉल हा तिच्यापेक्षा सोळा वर्षाने लहान आहे. सन 2013 पासून ललित मोदी व सुश्मिता सेन यांचा प्रेमाचा प्रवास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

या दोघांच्या नात्यावर सुश्मिताचा शेवटचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. रोहमन म्हणाला की या बातमीमुळे मला अजिबात धक्का बसलेला नाही. तो पुढं म्हणाला की, ‘त्या दोघांना आनंदी राहू द्या. प्रेम खूप सुंदर आहे. मला इतकंच माहिती आहे की, तिनं ज्याची निवड केली आहे ती व्यक्ती योग्य असेल. अभिनेत्री म्हणून सुश्मिताचं करिअर फार काळ गाजले नाही. मात्र खासगी आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. पन्नाशीच्या जवळपास पोहोचलेली ही ललना लग्नाच्या बेडीत अडकणार का? हे लवकरच समजेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here