जळगावला तरुणाची हत्या

जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रिक्षा चालक तरुणाची शनिवारी रात्री हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने हरिविठ्ठल नगर परिसरात खळबळ माजली आहे. दिनेश काशिनाथ भोई असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

जुन्या वादातून डोक्यात कोयता मारुन दिनेश भोई या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात असून एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विठ्ठल तुकाराम पाटील – हटकर असे पोलिसांच्या ताब्यातील संशयिताचे नाव असून या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अवस्थेत दिनेश यास सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, विजय पाटील, प्रितम पाटील, अक्रम शेख आदींनी सापळा रचून संशयीत विठ्ठल हटकर यास ताब्यात घेत रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजय शिंदे यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here