चोरीच्या दुचाकींसह अल्पवयीन बालक ताब्यात

जळगाव : रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या अल्पवयीन साथीदारास चोरीच्या चार मोटार सायकलींसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ताब्यातील अल्पवयीन बालकाचा मास्टर माईंड गुन्हेगार फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवासी, पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने मोटार सायकल चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना खब-याकडून समजली होती. सदर गुन्हेगार चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावत असल्याची अधिक माहिती देखील त्यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, भारत पाटील आदी सहका-यांचे पथक तयार केले होते. या पथकाने हरीविठ्ठल नगर भागात जावून आरोपीचा शोध घेतला.

पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागताच मास्टरमाईंड गुन्हेगार फरार होण्यात यशस्वी झाला. मात्र त्याचा अल्पवयीन साथीदार तपास पथकाच्या हाती लागला. त्या अल्पवयीन बालकाच्या ताब्यातून चोरीच्या चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हापेठ, एरंडोल, अमळनेर आणि रावेर पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here