अट्टल दुचाकी चोरट्यास अटक

जळगाव : अल्पवयीन बालकाच्या मदतीने मोटारसायकली चोरुन त्यांची विल्हेवाट लावणा-या रेकॉर्डवरील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. दादा बारकु ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  

दादा बारकु ठाकुर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोटार सायकली चोरण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलिसांसह दुचाकीचालक हैरान झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजलेल्या माहितीच्या आधारे दोन दिवसांपुर्वी अल्पवयीन गुन्हेगार बालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून चार गुन्ह्यातील मोटार सायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यातील अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दादा बारकु ठाकुर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

अटकेतील दादा ठाकुर याने त्याच्या साथीदार व अल्पवयीन बालकाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले आहे. अटकेतील दादा ठाकुर व ताब्यातील अल्पवयीन बालकाकडून एकुण नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामानंद नगर, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, धरणगाव, जामनेर, एरंडोल, अमळनेर आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.  

हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here