पाच रुपयात तरुणाला मिळाली फसवणूकीची लिंक!! खात्यातून 85 हजार गायब होताच झाले त्याला क्लिक

जळगाव : कमी किमतीत इलेक्ट्रीक सामान घेण्यासाठी दिल्ली गाठणा-या तरुणाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर ग्यानचंद वालेचा असे फसवणूक झालेल्या सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेल्या इलेक्ट्रीशियन तरुणाचे नाव आहे.

सागर ग्यानचंद वालेचा हा इलेक्ट्रीशियन तरुण आहे. त्याचे पेटीएम खाते युनीयन बॅक ऑफ इंडीया या बॅंकेसोबत लिंक आहे. कमी किमतीत इलेक्ट्रीक वस्तू घेण्यासाठी तो 23 जुलै रोजी दिल्ली येथे गेला होता. दिल्ली येथील प्रगती मैदानावर लाईट व केबलच्या वस्तूंचे प्रदर्शन लागले होते. त्या ठिकाणी क्रिस्टल केबल प्रा.लि. नावाच्या दुकानात तो गेला. तेथून त्याने काही वस्तू बुक केल्या. त्या वस्तू तुम्हाला कुरीयरने घरपोच येतील असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे तो जळगावला परत आला. त्यानंतर 29 जुलै रोजी त्याच्या मोबाईलवर पलीकडून एक कॉल आला.

आपका कुरीयर डीअ‍ॅक्टीव्हेट है, उसको अ‍ॅक्टीव्हेट करना पड़ेगा असे हिंदीतून बोलणा-या व्यक्तीने सागर यास सांगितले. कुरियर अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी पलीकडून बोलणा-याने त्याला मोबाईलवर एक लिंक एसएमएसच्या माध्यमातून पाठवली. त्या लिंकवर क्लिक करुन पाच रुपयांचे पेमेंट करण्यास सागर यास सांगण्यात आले. त्या फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सागरने त्याच्या बँकेचे नाव, फोन नंबर, रक्कम व युपीआय पिन इत्यादी माहीती भरली. त्यानंतर त्याच्या खात्यातून पाच रुपये कमी झाले.

सागरच्या खात्याचा तपशील फसव्या लिंकच्या माध्यमातून पलीकडून बोलणा-याने हस्तगत केला होता. दुस-याच दिवशी त्याच्या पेटीएम खात्यातून 79700 रुपये आणि युनियन बॅक ऑफ इंडीयाच्या खात्यातून 4199 रुपये असे एकुण 83899 रुपये वर्ग झाल्याचे मेसेज त्याला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here