जबरी चोरी करणा-यास अटक

जळगाव : चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणा-या वान्टेड आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. एकनाथ उर्फ एका उर्फ योगेश चिंतामण जाधव रा. नंदाणे ता. जि. धुळे ह.मु. सुरत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अटक करण्यात आलेल्या एकनाथ जाधव याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला सन 2014 मधे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांना हवा असलेला एकनाथ जाधव हा त्याच्या मुळ गावी धुळे जिल्ह्यातील नंदाणे या गावी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला पकडण्याकामी त्यांनी पोहेकॉ संदिप पाटील, पोना. प्रविण मांडोळे आदींचे पथक तयार करण्यात आले. तो सुरत येथून आपल्या गावी आला असतांना त्याला गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी ताब्यात घेत अटक केली. पुढील कारवाईकामी त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here