धोका देणाऱ्यांचं राज्य …….बंडखोरांनाच मंत्रीपद मिळतं” – बच्चू कडू

“जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं असे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलतांना आ. बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. धोका देणाऱ्यांचं राज्य असून, जो धोका देईल तोच मोठा नेता असून त्यालाच मंत्रीपद मिळतं असे देखील त्यांनी म्हटले आहे.

उशीरा येणा-याला पहिल्या पंक्तीत बसवले जाते व जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवण्यात आले. राजकारणात असे चालूच राहते, आपण तेवढे समजूतदार आहोत असे देखील आ. कडू यांनी म्हटले आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडे केवळ मंत्रीपदासाठी गेलो नव्हतो. केवळ मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नसून मंत्रीपदापेक्षा देखील बच्चू कडू जास्त महत्वाचा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पहिल्या यादीत आपले नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल अशी आशा व्यक्त करत ती यादी अडीच वर्षांनी देखील येवू शकते असे देखील त्यांनी म्हटले आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार नाही तर पाच होतात असे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here