गोंदियानजीक दोन रेल्वे गाड्यांची धडक

गोंदिया : रायपूर येथून नागपूरच्या दिशेने धावणा-या ‘भगत की कोठी’ या रेल्वे गाडीला गोंदिया शहरानजीक आज सकाळी चार वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे. पुढे धावणा-या मालगाडीला या गाडीने धडक दिली. या धडकेत “भगत की कोठी” या गाडीचा एक डबा रुळावरुन खाली घसरला.

या अपघातात पन्नास पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून रेल्वे प्रशासनातर्फे मदत सुरु करण्यत आल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधे उपचार सुरु आहेत. या धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here