पोलिस निरीक्षक सानप निलंबित

नगर : श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेत धर्मांतर करुन निकाह करत अत्याचार केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीसह त्याच्या टोळीला श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप मदत करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशीअंती पोलिस निरीक्षक संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सदर कारवाई केली आहे.

तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिचे धर्मांतर करत तिच्याबरोबर निकाह करुन तीन वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुल्ला कटरसह आणखी तिघा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके याच्याकडे आहे. आरोपींविरुद्ध इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असताना पोलिस निरीक्षक संजय सानप हे त्यांना मदत करत असल्याचा आरोप फिर्यादीकडून पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आला होता. चौकशीअंती पो.नि. सानप यांना निलंबित करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here