शस्त्र परवाना मागणारा लाचखोर अभियंता निलंबित

बीड : सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंबाजोगाई येथील लाचखोर कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याला सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रशासनाने त्याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. ठेकेदार दडपण आणतात, ठेकेदारांकडून आपल्या जीवाला धोका असून बीड जिल्ह्यात काम करणे अवघड असल्याचे कारण पुढे करत लाचखोर अभियंता कोकणे याने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून थेट शस्त्र परवान्याची मागणी केली होती.

दरम्यान 22 जून रोजी एका कंत्राटदाराकडून मोठ्या रकमेची लाच स्वीकारताना कोकणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला होता. अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. एवढा सगळा प्रकार होवून देखील त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नव्हती. अखेर कोकणे यास सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. निलंबनाच्या कार्यकाळात त्याला औरंगाबाद येथील मुख्य अभियंता कार्यालयात संलग्न करण्यात आले आहे. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here