जळगावनजीक म्हसावद येथे खड्ड्यात पडून उलटला ट्रक

जळगाव : जळगाव तालुक्यातील म्हसावद या गावातुन जाणा-या महामार्गावर आज लाकडाने भरलेला एक ट्रक रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याने उलटला. ट्रक उलटल्याचा आवाज येताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे रस्त्यावर रहदारीचे प्रमाण अत्यल्प होते. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी या घटनेत झाली नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

म्हसावद या गावातुन जाणा-या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याची गावक-यांची ओरड आहे. रस्त्याचे काम करणा-या ठेकेदाराने पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली नसल्यामुळे याठिकाणी नेहमीच लहान मोठे अपघात होतच असतात. कासव गतीने सुरु असलेल्या या महामार्गाचे काम वाहनचालकांसह पादचा-यांसाठी एक डोकेदुखी झाली आहे.

या रस्त्याच्या कामामुळे होणा-या त्रासाला वैतागून म्हसावद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र या आंदोलनाची दखल सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी घेतली नाही. दररोज होणारे अपघात बघता रहदारीसाठी पर्यायी रस्त्याची मागणी केली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here