फटाका दुकानातून अडीच लाख चोरीप्रकरणी गुन्हा

जळगाव : जळगाव शहराच्या पोलनपेठ परिसरातील महाराष्ट्र फटाका या दुकानातून अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलन पेठ परिसरात बोहरा मशीदसमोर शब्बीर अमरेलीवाला यांचे महाराष्ट्र फटाका हे दुकान आहे. या दुकानातून 5 व 6 ऑक्टोबर दरम्यान 2 लाख 54 हजार 300 रुपयांनी भरलेली एक आणि महत्वाची कागदपत्र असलेली दुसरी पिशवी अशा दोन पिशव्यांची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक विजय निकुंभ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here