विवाहितेवर बलात्कारासह सासु सास-यांना मारहाणीचा आरोप

जळगाव : विवाहितेवर बलात्कार करुन तिच्यासोबत फोटो काढून ते पती व सासु-सास-यांना दाखवण्याची तसेच मुलाला मारुन टाकण्याची धमकी तसेच तिच्या पती व सासु – सास-यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. वैभव इश्वर चौधरी व ऋषी ज्ञानेश्वर चौधरी असे आरोप व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे दिड महिन्यापुर्वी ती लोहारा येथील घरात एकटी होती. त्यावेळी गावातील वैभव इश्वर चौधरी हा दुपारच्या वेळी तिच्या घरात आला. त्याने तिचे तोंड दाबून ओरडलीस तर विचार कर असा दम देत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने तिच्यासोबत फोटो काढल्याचा देखील आरोप विवाहितेने केला आहे. ते फोटो तुझ्या पती व सासु सास-यांना दाखवेन अशा धमकीसह मुलाला मारुन टाकेन असा मेसेज त्याने विवाहितेला व्हाटसअ‍ॅपवर पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा देखील विवाहितेकडून आरोप करण्यात आला आहे.

7 ऑक्टोबर रोजी दुपारच्या वेळी विवाहिता घरी एकटी असतांना वैभव तिच्याजवळ आला. काही वेळाने घरात तिचा पती, सासे व सासरे देखील आले. आपल्या घरात वैभवला बघून त्यांनी त्याला जाब विचारला असता त्याने तिच्या पती व सासरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली असे विवाहितेचे म्हणणे आहे. आरडाओरड ऐकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी ज्ञानेश्वर चौधरी हातात लाकडी काठीसह त्याठिकाणी आला. त्याने विवाहितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. सासु सास-यांना देखील चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला वैभव चौधरी आणि ऋषी चौधरी या दोघांविरुद्ध गु.र.न. 298/22 भा.द.वि. 376, 354 (क), 452, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल पवार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here