पोलिस निरीक्षक नजनपाटील यांच्यासह जळगावच्या चौघांची पदोन्नती

जळगाव : जळगाव एलसीबीचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह चौघा अधिका-यांची डीवायएसपी पदी पदोन्नती झाली आहे. शासन पत्र क्र.रापोसे-0122/प्र.क्र.33 (भाग 2) पोल 1अ, दि. 2/11/2022 या संदर्भानुसार 3 नोव्हेंबर2022 रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हे जाहीर करण्यात आले आहे.

जळगाव एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड, डीएसबीचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत या चौघांचा पदोन्नतीच्या यादीत समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here