जावयाने केली सासूकडे घरफोडी – दोघांना अटक

जळगाव : घराच्या खाली असलेल्या गोडावूनमधून तीस वर्ष जुने सोन्याचे दागिने चोरुन नेणा-या जावयासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जावयानेच साथीदारांच्या मदतीने सासरवाडीच्या गोडावूनमधून दागिने चोरी केल्याचे उघड झाल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तुषार विजय जाधव (पाटील) रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव असे जावयाचे तर सचिन कैलास चव्हाण (रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे.

स्वातंत्र्य चौकातील साईबाबा मंदीराजवळ सौ. मीरा आनंद पाटील या गृहीणी राहतात. त्यांच्या घराच्या गोडावूमधून 7 नोव्हेंबरच्या रात्री 58 हजार 500 रुपये किमतीचे तिस वर्ष जुने सोन्याचे दागिने चोरी झाले होते. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी करत होते. हा गुन्हा सौ.मीरा पाटील यांच्या जावयासह त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे तपासकामी पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, प्रितम पाटील, दिपक शिंदे, राहुल बैसाणे आदींचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून तुषार जाधव यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीअंती त्याने हा गुन्हा चौघा साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड केले. त्याच्यासह सचिन कैलास पाटील याला देखील अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here