दुकान फोडून मोबाईल चोरणारा मिथुन अटकेत

जळगाव : पाळधी येथील पत्र्याच्या दुकानाचे कुलूप तोडून त्यातील मोबाईल व इतर सामानाची चोरी करणा-या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मिथुनसिंग मायासिंग बावरी (रा. कजगाव ता. भडगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

कजगाव येथील रहिवासी मिथुनसिंग बावरी याने पाळधी येथील मोबाईलच्या दुकानातून मोबाईलसह इतर वस्तूंची चोरी केली असून तो चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती.

त्या माहितीच्या आधारे पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक पाटील, किशोर राठोड, पोकॉ विनोद सुभाष पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने मिथुनसिंग बावरी यास कजगाव येथून ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याने त्याच्या कब्जातील चोरीचा रिअलमी कंपनीचा मोबाइल हॅंडसेट पोलिसांना काढून दिला. धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपासकामी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here