दुध संघातील तुपाचा भलामोठा गोलमाल!!— अठराशे किलो तुपात कोणकोण मालामाल?

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघातील सुमारे विस लाख रुपये किमतीपेक्षा अधिक किमतीचे तुप अवघ्या दिड लाख रुपयांत विकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. 1800 किलो तुप 85 रुपये दराने प्रशासक समितीची परवानगी न घेता शहरातील विठ्ठल रुख्मिनी सोसायटीला 1 लाख 53 हजार रुपयात विकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासप्रकरणी दुध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील, अनिल हरिशंकर अग्रवाल, चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील, रवी मदनलाल अग्रवाल अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी निखील सुरेश नेहेते हे जामीनावर मुक्त आहेत.

या अठराशे किलो तुपाचा घोळ अजून तरी कायम असल्याचे म्हटले जात आहे. या अठराशे किलो तुपाचा ताळमेळ केव्हा बसणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहर पोलिसांनी जप्त केलेले तुपाचे डबे सिल करण्यात आले असून ते फुड अ‍ॅंण्ड ड्रग्स कार्यालयात तपासणीकामी पाठवले जाणार आहेत. हे तुप खाद्य आहे की अखाद्य आहे याची तपासणी केली जाणार आहे.

पोलिसांच्या अटकेतील हरी रामु पाटील हाच सर्व झोलझालचा सुत्रधार असल्याचे म्हटले जात आहे. अटकेतील कार्यकारी संचालकांच्या मुक संमतीने हरी रामु पाटील हेच सर्व कारभार बघत असल्याचे म्हटले जात आहे. हरी रामु पाटील यांच्याकडून अनिल अग्रवाल यांना विक्री केलेले बी ग्रेड तुपाचे डबे निमखेडी शिवारातील शिवधाम मंदीरात वापरले जात होते असे म्हटले जाते. शिवधाम मंदीरात जर खरोखरच बी ग्रेड तुप वापरले गेले असेल तर अग्रवाल यांनी देवाची देखील फसवणूक केली असे म्हटले जाते. मंदीराच्या नावाखाली हे तुप विकत घेवून काळ्या बाजारात विकले गेले असेल तरी देखील ही देवाची फसवणूक आहे असे म्हटले जात आहे.

शिवधाम मंदीराला दरमहा तुपाचे अकरा डबे लागतात असे म्हटले जात आहे. एक डबा साधारण 15 किलोचा असतो. दर महिन्याला 165 किलो आणि तिन महिन्यात सुमारे 495 किलो तुप मंदीराला लागते. वर्षाचा हिशेब केल्यास साधारण 1980 किलो तुप एकट्या मंदीराला लागते असे गृहीत धरुया. मात्र गेल्या दोन ते तिन महिन्यातच 1350 किलो तुप हरी पाटील यांनी अनिल अग्रवाल यांना विक्री केल्याचे समजते. गेल्या दोन ते तिन महिन्यात 495 किलो तुप अनिल अग्रवाल यांनी मंदीरात वापरण्यासाठी खरेदी केले असेल तर आठशे ते नऊशे किलो तुप गेले कुठे? असा देखील प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित केला जात आहे.

अटकेतील अनिल अग्रवाल यांनी मंदीरासाठी खरेदी केलेले तुप मंदीरात नाही. ते अटकेतील रवी अग्रवाल याच्याकडे देखील नाही. अकोला येथे रवी अग्रवाल याच्याकडे पोलिस पथकाने छापा टाकला असता तुपाचा माल मिळून आला नाही. तुपाच्या रिकाम्या डब्याचा माल भंगारवाल्याकडे आल्याचे म्हटले जाते. मात्र भंगारवाल्याने ते रिकामे डबे विकून टाकल्याची चर्चा सुरु आहे. मग एवढा तुपाचा माल गेला कुठे? हा एक गहन प्रश्न यानिमीत्ताने निर्माण झाला आहे.

साडेचार हजार किलो तुपाची रक्कम अग्रवाल यांच्याकडून हरी पाटील यांना एक वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन मिळाल्याचे म्हटले जात आहे. एकंदरीत हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल हे तिघे संशयाच्या गडद भोव-यात सापडले आहेत. दरम्यान सील केलेले तुप फुड अ‍ॅंड ड्र्ग्ज विभागाकडे तपासणीकामी पाठवण्यात येणार असल्याचे समजते. सहायक अन्न व औषध आयुक्तांकडे याप्रकरणी तक्रार केली जाणार असल्याचे देखील समजते. याशिवाय अकोला येथील फुड अ‍ॅंड ड्रग्ज अधिकारी देखील धाड टाकणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळीपुर्वी अन्न व औषध प्रशासनाकडून बटरचा माल सिल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाची निवडणूक जाहीर झाली असतांना सर्वच गैरव्यवहार चव्हाट्यावर येत आहेत. एकंदरीत जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाचा गैरकारभार जनतेला चांगल्याप्रकारे समजत आहे. दुध संघाच्या निवडणूकीत उभा असणारा प्रत्येक उमेदवार आपणच शेतक-यांचा कैवारी असल्याचे म्हणत असतो. मात्र सर्वांनाच दुध संघातील लोणी,दुध, तुपरुपी पैसा प्यारा असतो असे खुलेआम म्हटले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here