जुने घर पाडतांना भिंत कोसळून तरुण ठार

जळगाव : नविन घराच्या बांधकामासाठी जुने घर पाडतांना भिंत कोसळून तरुण ठार झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश जोलसिंग चव्हाण (20) रा. रामदेववाडी वावडदा ता.जिल्हा जळगाव असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

इश्वर केशव राठोड (रा. रामदेववाडी वावडदा) हा जुने घर तोडून देण्याचे काम करणारा ठेकेदार आहे. ठेकेदार इश्वर राठोड याच्यासह रमेश जोलसिंग चव्हाण व इतर तरुण पारोळा तालुक्यातील बाभळेनाग या गावी जुन्या घराचे तोडकाम करण्यासाठी गेले होते. दुपारच्या वेळी ब्रेकर मशिनने जुन्या घराच्या भिंतींचे तोडकाम सुरु होते. त्याच भिंतीजवळ रमेश चव्हाण हा पाणी पिण्यास बसला होता.

त्याचवेळी अचानक भिंत कोसळल्याने रमेश चव्हाण जबर जखमी झाला. त्याला खासगी वाहनाने कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. ठेकेदार इश्वर राठोड याने भिंत पाडण्यासाठी लागणारी सुरक्षीत साधने उपलब्ध करुन दिली नाही तसेच निष्काळजीपणे भिंत पाडल्यामुळे रमेश चव्हाण याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत इश्वर राठोड याचा भाऊ सुदाम चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजू जाधव करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here