अठरा लाखाच्या मुद्देमालासह सराफाच्या लुटप्रकरणी गुन्हा

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

जळगाव : सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 17 लाख 80 हजार रुपयांच्या मुद्देमालाची सराफाकडून लुट झाल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ माजली आहे.

निलेश वसंत सोनार यांचे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा या गावी धनाई ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. उचंदा येथील सराफी दुकान बंद करुन निलेश सोनार हे त्यांच्या गावी नरवेल येथे 30 नोव्हेंबर रोजी मोटार सायकलने सायंकाळी सव्वा सहा वाजता परत जात होते. वाटेत नरवेल फाटा ते नरवेल दरम्यान मोटार सायकलवर आलेल्या तिघा अनोळखी कोणत्यातरी धारदार शस्त्रासह दगडाने त्यांना मारहाण केली.

9 लाख रुपये किमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 80 हजार रुपये किमतीचे दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने व 8 लाख रुपये रोख असा एकुण 17 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तिघा अज्ञात मोटार सायकलस्वारांनी जबरीने लुटून नेला. या घटनेप्रकरणी 1 नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 391/22 भा.द.वि. 394 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here