चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

जळगाव : चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. पवन संजय साळुंखे उर्फ बडगुजर (रा. सुंदरगढी पुंडलीक नगर चोपडा)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पवन साळुंखे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पाच पैकी एक मोटार सायकल चोपडा शहर पोलिस स्टेशला दाखल गुन्ह्यातील आहे. इतर चार मोटार सायकलची माहिती प्राप्त करणे बाकी आहे. पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत हे.कॉ. जितेंद्र सोनवणे, सुनिल पाटील, विलास सोनवणे, महेंद्र साळुंखे, पोलिस नाईक हेमंत कोळी, पो.कॉ. प्रकाश मथुरे, प्रमोद पवार आदींनी सहभाग घेतला. हे.कॉ. जितेंद्र सोनवणे पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here