प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

जळगाव : धारधार शस्त्राने हल्ला चढवत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेतील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशाल संजय पवार असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर संशयीताचे नाव आहे.

4 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी अकरा वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनी परिसरातील प्रियंका किराणा दुकानाजवळ जुन्या वादातून पाच जणांनी कैलास विश्राम चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी तुषार सोनवणे, प्रतिक पांडुळे, दादू सपकाळे, नयन येवले आणि विशाल सोनवणे अशा पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर चौघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली होती. मात्र यापैकी विशाल सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ जितेंद्र राजाराम पाटील, पोहेकॉ राजेश बाबुराव मेढे, पोहेकॉ अक्रम याकुब शेख, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना अविनाश देवरे, पोना नितीन बाविस्कर आदींच्या पथकाने फरार हल्लेखोर विशाल सोनवणे यास मेहरुण भिलाटी परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली आहे. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here