जळगाव जिल्ह्यातून दोघे एक वर्षासाठी हद्दपार

जळगाव : जळगाव जिल्हातून दोघा गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील आकाश अजय सोनार (रा. लक्ष्मी नगर, पंचमुखी हनुमान मंदीराच्या मागे, जळगाव) आणि अविनाश रामेश्वर राठोड (रा. रामेश्वर कॉलनी, रेणुका मंदीरा जवळ, जळगाव) अशी हद्दपार केलेल्या दोघांची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत खूनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे या सदराखाली दोघांविरुद्ध दहा गुन्हे दाखल असून त्यांना वेळोवेळी अटक झालेली आहे. तरीदेखील त्यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झालेला नाही. त्यांच्यावर कायद्याचा वचक राहण्यासाठी दोघा गुन्हेगारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनकडून पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या अनुशंगाने पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दोघा आरोपींविरुद्ध पुढील कारवाई करत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे त्यांना जळगाव जिल्हयातून एक वर्षाकरीता हद्यपार केले आहे.

पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सुनिल दामोदरे, युनुस शेख, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, म.पो.ना. निलोफर सैय्यद, पो.ना. सुधीर सावळे, हेमंत कळकसर, साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here