अल्पवयीन मुलीस पळवणा-या पश्चिम बंगालच्या आरोपीस अटक

जळगाव : पश्चिम बंगालमधील अल्पवयीन मुलीस पळवून आणणा-या आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अपह्रत अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समितीच्या न्यायपिठाच्या ताब्यात देण्यात आले आहे. चंदन कुचील चटोपाध्याय, रा. सहारजोरा बंकुरा मुक्ततोर वेस्ट बंगाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथील कुलताली पोलिस स्टेशनला याप्रकरणी गु.र.नं. 769/2022 भा.द.वि. 363, 365 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

अल्पवयीन मुलीला पळवून आणणारा आरोपी चंदन चटोपाध्याय हा जळगाव शहरात असून त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याबाबतचे पत्र पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांना एनजीओ दिल्ली यांचेकडून मिळाले होते. त्या पत्राच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी आपल्या सहका-यांना पुढील तपासकामी रवाना केले होते.  

स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रितम पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, प्रविण मांडोळे, सचिन महाजन, उमेश गोसावी महिला अंमलदार अभिलाषा मनोरे, वैशाली सोनवणे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चंदन चटोपाध्याय (रा. सहारजोरा बंकुरा मुक्ततोर वेस्ट बंगाल) यास महामार्गावरील गोदावरी महाविद्यालय परिसरातील हॉटेल सुमेरसिंग जवळून ताब्यात घेतले. आरोपी चंदन चटोपाध्याय यास या गुन्ह्याचे तपासी अंमलदार काशिनाथ प्रमाणीक यांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीस बाल कल्याण समिती, जळगाव बेंच ऑफ मॅजिस्टेट (न्यायपीठ) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here