जीम ट्रेनरवर प्राणघातक हल्ला – अठरा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : भुसावळ शहरातील जीम ट्रेनरला जीवे ठार करण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी अठरा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफाफ अख्तर पटेल असे खडका रोड परिसरात राहणा-या जखमी तथा फिर्यादी जीम ट्रेनरचे नाव आहे.

अफाफ पटेल हा जीम ट्रेनर कॅरम खेळत असल्याची माहिती बिलाल बागवान व शेख हमजा शेख रफीक या दोघांनी इतर हल्लेखोरांना 4 फेब्रुवारी रोजी दुपारी व रात्री दिली होती. त्या माहितीच्या आधारे रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोमान शेख शकील, तेहरीन नासीर शेख, शेख समीर शेख, फिरोज आणि लतीफ तडवी यांनी अफाफ पटेल यास गाठून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत रॉड आणि लाठ्यांनी मारहाण केली. यात अफाफ पटेल हा जीम ट्रेनर जबर जखमी झाला.

याशिवाय दानिश शेख फरीद, शेख उबेद शेख अक्रम, मुजम्मील शेख फरीद, तोहीद शेख नसीर शेख, अबुजर शेख बशीर, मुस्तफा शाह युनुस शाह, नासिर सन्नाटा आदींनी दरवाजावर उभे राहून मारहाण करणा-यांना मदत केली. यात इम्मू कोलरीया, कल्लू तडवी आणि अक्रम शेख सबदर शेख या तिघांनी मोटारसायकलवर बसून उपस्थित हल्लेखोरांना मदत केली. कलीम उंद्री व शरीफ उंद्री या दोघांनी अफाफ पटेल यास जीवे ठार मारण्याचा कट रचून जबर मारहाण केली. यात अफाफ पटेल याचे दोन्ही हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. मंगेश गोंटला करत आहेत.   

 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here