ओळख परेड दरम्यान दुकानदाराची लुट करणारे निष्पन्न – सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : आठ लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल चार्जर, हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह आणि डायरी असा ऐवज असलेली दुकानदाराची बॅग हिसकावणा-या चौघांसह त्यांना टिप देणारा दुकानातील नोकर अशा एकुण पाच जणांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 27 जानेवारी रोजी अटक केली आहे. 23 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेतील पाचही जणांना ओळख परेडअंती फिर्यादी दुकानदाराने ओळखले आहे. याशिवाय त्यांच्याकडून 6 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गेलेल्या मुद्देमालापैकी 4 लाख 93 हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यांचा जप्त मुद्देमालात समावेश आहे.

जळगावच्या दाणा बाजारातील संत हरदासराम ट्रेडर्स या दुकानाचे मालक इश्वर बारुमन मेघाणे हे 23 जानेवारीच्या रात्री नऊ  वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन सिंधी कॉलनीच्या दिशेने मोटारसायकलने घरी जात होते. वाटेत पांडे डेअरी चौकात रामदेवबाबा मंदीराजवळ त्यांची लुट करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानात काम करणारा नोकर शेखर निंबा पाटील (रा. ममुराबाद ता. जळगाव) यानेच त्याच्या साथीदारांना टीप दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली होती. याशिवाय एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने इतर संशयीत गुन्हेगारांना अटक केली होती. त्यात लोकेश मुकुंदा महाजन, अक्षय शामसुंदर मिश्रा, स्वप्निल उर्फ बापू मधुकर पाटील, खुशाल दिलीप तायडे आदींचा समावेश आहे.

अटकेतील सर्वांची नावे निष्पन्न करुन त्यांना तहसीलदारांसमक्ष हजर करण्यात आले. त्यांना फिर्यादी दुकानदार इश्वर मेघाणे यांनी ओळखले आहे. अटकेतील संशयीत आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान त्यांच्याकडून गेल्या मुद्देमालापैकी गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलसह 4 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील लोकेश मुकुंदा महाजन याच्यावर मालाविरुध्दचे 7 गुन्हे दाखल असून खुशाल उर्फ बंटी दिलीप तायडे याच्यावर शरीराविरुध्दचे दोन गुन्हे दाखल आहेत. अटकेतील संशयीत आरोपीनी नियोजनबध्द कट कारस्थान रचून हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउनी आनंदसिंग पाटील, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, सुधीर साबळे, विकास सातदीवे, पोकॉ छगन तायडे, मुकेश पाटील, किरण पाटील, राहुल रगडे, चालक इम्तीयाज अली खान, महीला अंमलदार सपला येरगुंटला आदींनी या तपासकामी सहभाग घेतल. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here