21 लाखाच्या गैरव्यवहार प्रकरणी सचिवाविरुद्ध गुन्हा

जळगाव : अमळनेर तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत तत्कालीन सचिव पदावर असतांना पदाचा दुरुपयोग करुन 21 लाख 45 हजार 332 रुपयांचा गैरव्यवहार व अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त सचिव वसंतराव पुरुषोत्तम पाटील यांच्याविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम अप्पर लेखापरिक्षक सहकारी संस्था (पारोळा) भिकन विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंतराव पाटील (रा. संजीवनी नगर चोपडा) हे वि.का.सोसायटीत सचिव पदावर असतांना पदाचा दुरुपयोग करुन दस्तावेजात खाडाखोड, गिरवागिरव करुन ते खरे म्हणून वापर केल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. कर्जदारांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्जाच्या रकमेचा भरणा तत्कालीन सचिव वसंतराव पाटील यांच्याकडे दिला असतांना मध्यवर्ती बॅंक शाखेत जमा न करता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आपल्याकडे ठेवून भरणा दाखवून रजिस्टरमधे खाडाखोड करुन पदाचा दुरुपयोग केल्याचे म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद पाटील करत आहेत.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here