जळगाव : विवाहीत तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिला आयटम…आयटम असे बोलून विवाहितेचा विनयभंग करणा-या तरुणाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका 33 वर्ष वयाच्या विवाहीतेचा ती रहात असलेल्या गावातील तिच्याच वयाचा तरुण पाठलाग करुन तिला आयटम आयटम असे बोलून अश्लिल हातवारे करत होता. तिच्या पतीने या प्रकाराला विरोध केला असता त्याने विवाहितेस जवळ ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. या झटापटीत तिच्या उजव्या कानातील रिंग आणि मोबाईलचे नुकसान झाले. विवाहीतेचा दीर तिच्या बचावासाठी आला असता त्याला देखील त्याने डोक्यावर मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार करत आहेत.