मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलतोय सांगत तरुणीची 69 हजारात फसवणूक

जळगाव : आधी कुरिअर सेंडर मधून नंतर काही वेळाने मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलत असल्याची बतावणी करत काहीही संबंध नसतांना मनात भिती घालून धरणगाव तालुक्यातील नोकरदार तरुणीची 69 हजार 549 रुपयात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

धरणगाव तालुक्यातील एका नोकरदार तरुणीला तिच्या मोबाईलवर अज्ञात इसमाचा 18 मार्च रोजी कॉल आला. मुंबई येथून कुरिअर सेंडर मधून बोलत असल्याची बतावणी करत तुमच्या नावाचे कुरिअर आले आहे असे पलीकडून बोलणा-याने  तरुणीला म्हटले. कुरिअर वर अंधेरीचा पत्ता असल्याचे देखील पलीकडून बोलणा-याने तरुणीला म्हटले.आपण काहीही मागवले नसून तो पत्ता देखील आपला नसल्याची माहीती तरुणीने पलीकडून बोलणा-या अज्ञात व्यक्तीला दिली.

तुमच्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असून मी तुम्हाला सायबर क्राईम ब्रॅंच सोबत संपर्क करुन देतो त्यांचे मार्गदर्शन घ्या असे म्हणत त्या व्यक्तीने म्हटले आणि फोन बंद केला. काहीवेळाने पलीकडून दुस-याच मोबाईल क्रमांकावरुन तरुणीला फोन आला. मी मुंबई क्राईम ब्रॅंच मधून पोलिस बोलत असून तुमच्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याचे आम्हाला दिसत असल्याची बतावणी त्याने केली. फोन सुरु असतांनाच बोलणा-याने तरुणीच्या व्हाटस अ‍ॅप क्रमांकावर एक लिंक पाठवली. तुमचे आधार कार्ड पाठवा असे म्हणत पलीकडून बोलणा-याने तरुणीला हळूहळू भितीच्या आणि फसवणूकीच्या  जाळ्यात फसवण्यास सुरुवात केली. काही वेळाने तुमच्यावर मनी लॉंड्रिंगची केस झाली आहे अशी भिती घातली. मोठ्या साहेबांना सांगावे लागेल परंतु आम्हाला सहकार्य करावे लागेल अशी बतावणी केली.

अशा प्रकारे एक ना अनेक प्रकारची भिती आणि धमकी देत 98 हजार 326 रुपयांची मागणी केली. कारवाईची भिती दाखवत आणि त्या भितीला व धमकीला बळी पडून तरुणीने त्यांना ती रक्कम पाठवली. नंतर त्या क्रमांकावर तरुणीने कॉल केला असता संपर्क बंद झाला. आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणीच्या लक्षातआले. तरुणीने धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करत आहेत.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here