बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर लुट

जळगाव : अमळनेर तालुक्याच्या डांगर शिवारातील पेट्रोल पंपावर बंदूकीच्या धाकावर 36 हजाराची लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधे कैद झाला आहे. गुरुवारच्या मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.

डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरुवारच्या रात्री सव्वा बारा वाजता काळ्या रंगाच्या रुमालाने आपली ओळख लपवणा-या तरुणाने हा प्रकार केला आहे. पेट्रोल पंपावर झोपलेल्या कर्मचा-यांना त्याने उठवले. बंदूकीचा धाक दाखवत त्याने इंधन विक्रीचे पैसे जबरीने हिसकावून घेतले. याशिवाय एका कारचालकाकडून देखील पाकीट हिसकावून घेतले. या घटनेनंतर तो आपल्या साथीदारासह मोटारसायकलने धुळे शहराच्या दिशेने फरार झाला. ग्रामरक्षक दलाने जोमाने सक्रीय होण्याची गरज या निमीत्ताने व्यक्त केली जात आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या कार्यकाळात ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून चोरीच्या घटनांना चांगल्याप्रकारे आळा बसला होता. याशिवाय बरेच गुन्हे देखील उघडकीस आले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here