अत्याचारातून तेरा वर्षाची मुलगी गर्भवती

जळगाव :  अत्याचारातून तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याच्या घटनेप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला अंदाजे अठरा वर्ष वयाच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाल्याने खळबळ माजली आहे.

रावेर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी साधारण सात महिन्यापुर्वी आपल्या घरी एकटी होती. त्यावेळी संबंधीत मुलाने ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यासोबत जबरीने शरीर संबध प्रस्थापीत केले. कुणाला या प्रकाराबाबत सांगितले तर जीवे ठार करण्याची धमकी देखील त्याने पिडीत मुलीला दिली. त्यानंतर वेळोवेळी संधी साधून त्याने तिच्यावर तिन वेळा जबरीने शरीर संबंध प्रस्थापीत केले.

बदनामी आणि भितीपोटी मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर गेल्यावर्षी दसरा सण झाल्यानंतर ती तिच्या भावासोबत उसतोडणीसाठी बारामती परिसरात गेली होती. त्यानंतर ती पुन्हा आपल्या गावी रावेर तालुक्यात परत आली. त्यावेळी तिच्या पोटाचे आकरमान वाढलेले  दिसून आले. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला जळगाव सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकामी आणले. डॉक्टरांनी तपासणीअंती सात महिन्याची गर्भवती असल्याचे कथन केले. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उप निरीक्षक दिपाली पाटील पुढील तपास करत आहेत.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here