अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य – दुकानदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

जळगाव : घरात आणि दुकानात कुणी नसतांना दुकानदाराने अल्पवयीन अजान मुलीस बोलावून तिच्यासोबत गैरकृत्य करणा-या दुकानदाराविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप सुका कोळी असे बलात्काराचा आरोप करण्यात आलेल्या थोरगव्हाण ता. रावेर या संशयीत आरोपीचे नाव आहे.

या घटनेतील पिडीत बालिकेचे वय सुमारे अकरा वर्ष आहे. या बालिकेला प्रदिप कोळी याने दुकानात चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यासोबत गैरकृत्य केले. पिडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलिस स्टेशनला संशयिताविरुद्ध गु.र.न. 95/23 भा.द.वि. 376 अ, ब, पोस्को 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अन्वर सरदार तडवी करत आहेत. संशयीतास अटक करण्यात आली आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here