पारोळा तालुक्यात सापडला कुजलेला मृतदेह – परिसरात खळबळ

जळगाव : पारोळा तालुक्यातील शिरसमणी या गावी एका शेतातील विहीरीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून हा मृतदेह या विहीरीत पडून असल्याचा अंदाज लावला जात आहे. मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला आहे.

पारोळा पोलिस स्टेशन हद्दीत श्रीकृष्ण सुकलाल पाटील यांच्या शिरसमणी येथील शेतात आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाच्या हातावर रोहन दीपक PM असे गोंदलेले आहे. मृतदेहाचे वय अंदाजे 30 ते 35 वयोगटातील आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुणाला मृतदेहाची ओळख पटत असल्यास त्यांनी तातडीने हे.कॉ. विजय भोई यांच्याशी 9623443162 अथवा पारोळा पोलिस स्टेशनच्या  02597292333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here