आंतरजातीय विवाह केल्याच्या राग – चौघांकडून मारहाण

जळगाव : आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरुन तरुणासह त्याच्या आईला आणि परिवारातील सदस्यांना मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथील एकाच परिवारातील दोन पुरुष आणि दोन महिला अशा चौघांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत महिलेच्या मुलाने जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथील एका तरुणीसोबत आंतरजातीय विवाह केला आहे. आपल्या परिवारातील मुलीसोबत आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरुन कानळदा येथील चौघांनी मिळून चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथील तरुणास त्याच्या आईसह वडील, नवविवाहीत सुन आणि लहान मुलगा अशा सर्वांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एकाने काठीने तर दुस-याने कु-हाडीने मारहाण करुन दुखापत केली. याशिवाय जीवे ठार मारण्याची धमकी देखील चौघांकडून देण्यात आली. यातील एकाने तरुणाच्या आईला जमीनीवर लोटून तिचा विनयभंग केला. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक जगदीश कोळंबे करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here