दहा लाखात ऑनलाईन फसवणूक – विविध इसमांविरुद्ध गुन्हा

जळगाव : क्रिप्टोकरन्सी देण्याचे आमिष दाखवत 10 लाख 42 हजार 600 रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या सहा ते सात जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव येथील इम्पोर्ट – एक्स्पोर्ट व्यवसाय करणा-या व्यावसायीकाची या घटनेत फसवणूक झाली आहे.

कैलास बजरंग परदेशी हे जळगाव शहरातील आहुजा नगर परिसरात राहतात. त्यांचा इम्पोर्ट – एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांच्या मोबाईलवर गेल्या मे महिन्यापासून वेळोवेळी विविध क्रमांकावरुन कॉल आले. कॉल करणा-या इसमांनी त्यांची नावे अक्रम खान, अमित, सुरेश अशी असल्याचे त्यांना सांगितले. क्रिप्टो करन्सी देण्याचे आमिष कैलास परदेशी यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला परदेशी यांनी पलीकडून बोलणा-यांच्या बॅंक खात्यात 39 हजार रुपये वर्ग केले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी पलिकडून बोलणा-यांनी परदेशी यांना तेवढ्याच रकमेची क्रिप्टो करन्सी दिली.

पलीकडून मोबाईलवर बोलणा-या अनोळखी व्यक्तींवर कैलास परदेशी यांचा विश्वास बसला. त्यामुळे त्यांनी विविध व्यक्तींच्या बॅंक खात्यावर एकदा 5 लाख आणि नंतर 5 लाख 42 हजार 600 रुपये वर्ग केले. मात्र नंतर त्यांना कोणतीही रक्कम क्रिप्टो करन्सीच्या रुपात मिळाली नाही. जादा पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल असे आश्वासन कैलास परदेशी यांना देण्यातआले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी दहा लाखाहून अधिक रक्कम भामट्यांच्या खात्यात वर्ग केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली. पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे करत आहेत.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here