बंद दुकानातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना अटक

जळगाव : मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. टिकाराम कोमल मोरे (रा. केवडीपुरा, एरंडोल) आणि पंकज मंगल वाघ (रा. हिंगोणा ता.धरणगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दुकानातून चोरी झालेल्या मोबाईलपैकी 70 हजार 697 रुपये किमतीचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

एरंडोल शहरातील म्हसावद रोडवरील शेतकीसंघ कॉम्प्लेक्स मधील हरीओम ईटरप्रायजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील मोबाईल व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते. या घटने प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरी झालेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक व मोबाईलमधील क्रमांकाचे लोकेशन मिळवून पुढील तपासासह कारवाईला स्थानिक गुन्हे शाखेने वेग दिला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकाने एरंडोल शहराच्या केवडीपुरा भागातून टिकाराम कोमल मोरे, धरणगाव तालुक्यातील हिंगोणा येथून पंकज मंगल वाघ आणि कासोदा येथील एक जण अशा तिघांकडून चोरी झालेल्या मोबाईलपैकी अंदाजे 70 हजार 697 रुपये किमतीचे नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

टिकाराम मोरे आणि पंकज वाघ अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. टिकाराम सोनवणे याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा साथीदार प्रविण रविंद्र बागुल (रा. केवडीपुरा एरंडोल) याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले. मात्र पोलिस कारवाईचा सुगावा लागल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाला.  पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, संदिप सावळे, महेश महाजन, पो.ना. नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, पो. कॉ. लोकेश माळी, महीला पो.ना. उपाली खरे, चालक हे.कॉ. भरत पाटील व पो.कॉ. प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील दोघांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद बागल करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here