कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द करावे – आम आदमी पार्टीची मागणी

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक पद्धतीने 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी नाशिक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याविरोधात निवेदन देण्यात आले.

आधीच सर्व शेतकऱ्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या वाईट असताना कांद्यासारख्या नगदी पिकाला चांगला भाव देशात व विदेशात मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना शेतकऱ्याच्या तोंडातून घास हिरावून घेण्याचे काम निर्यात शुल्क वाढवल्यामुळे होणार आहे. सदर बाब ही शेतकरी विरोधी आहे. म्हणून सदर 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी आदमी पार्टी नाशिकच्या वतीने करण्यात आली. लवकरात लवकर सदर वाढ रद्द झाल्यास, रास्ता रोको करण्याचा ईशारा यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे, यावेळी राज्य संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे, स्वप्निल घिया, युवा आघाडी सचिव प्रदीप लोखंडे, अमित यादव,अनिल फोकणे, सुमित शर्मा,दीपक सरोदे महेंद्र मगर,संदीप गोडसे,रोहित चव्हाण,चैतन्य त्र्यंबके ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here