हृदयापासून हार्दिक अभिनंदन  इस्रो – अशोकभाऊ जैन

जळगाव : इस्त्रोच्या यशस्वी चांद्रयान – 3 च्या यशस्वी लॅंडींग मुळे देशभरात देशप्रेमाची लाट उसळली असून उत्साह दिसून येत आहे. चांद्रयान – 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर जळगाव येथील जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले, ही घटना पाहताना सर्व देशवासियांना आनंदाचा उर भरून आला, इस्रोच्या प्रत्येक सदस्यांबद्दलचा अभिमान अधिक द्विगुणित झाला आहे, या मोहिमेद्वारे दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा डौलाने फडकवणारा पहिला देश ठरलो  ही खूप मोठी गर्वाची बाब आहे, या मोहिमेद्वारे भारताचा चंद्र स्पर्श झाला याचा मनस्वी आनंद आहे, इस्रोच्या टीमला हृदयापासून शुभेच्छा श्री.अशोक जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here