गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

जळगाव, दि.०८ (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्ताने अर्थात गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इ. ६ वी ते ८ वी गटासाठी ‘पर्यावरण आणि विकास’, ९ वी ते १२ वी गटासाठी ”जाती’ अंत हाच पर्याय’ तर प्रथम वर्ष ते पदव्युत्तर गटासाठी ‘राष्ट्रपुरुषांच्या अनादराने काय साध्य होईल?’ हे विषय देण्यात आले आहे. दिलेल्या विषयावर विद्यार्थ्याला ४ मिनिटांची व्हिडीओ क्लिप तयार करून https://forms.gle/facmSqHUjoBdsEcC6 या लिंकवर अपलोड करावयाचा आहे. व्हिडीओ अपलोड करावयाची अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२३ आहे.

महाविद्यालयीन गटाची दुसरी व अंतिम चाचणी दि २६ सप्टेंबर २३ रोजी जळगाव येथे होणार असून त्यांना आयत्या वेळच्या विषयांवर आपले विचार प्रकट करावयाचे आहे. तसेच परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अपेक्षित आहे. विजयी स्पर्धकांचा निकाल दि. २ ऑक्टोबर २३ रोजी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल. शालेय गटासाठी रु. ५०००/-, रु. ३०००/- व रु. २०००/- तसेच दुसऱ्या गटासाठी अनुक्रमे रु. ७०००/-, रु. ५०००/- व रु. ३०००/- तर महाविद्यालयीन गटासाठी अनुक्रमे रु. १००००/-, रु. ७०००/- व रु. ५०००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी http://www.gandhifoundation.net/GRF_comp_2023_ENG.htm येथे भेट द्यावी. जास्तीत जास्त शाळा – महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here