अपु-या वैद्यकीय ज्ञानवर केले ऑपरेशन —- गुदद्वार चिरुन कर्करोगाचे दिले आमंत्रण

जळगाव : शस्त्रक्रियेचे पुरेसे ज्ञान नसतांना वैद्यकीय सेवा देणा-या कथित डॉक्टरने रुग्णाच्या गुदद्वाराची चिरफाड करुन मुळव्याधीचे ऑपरेशन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ऑपरेशनमुळे रुग्णास गुदद्वाराचा कर्करोग झाल्याप्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला संबंधीत कथित डॉक्टर विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशपाल समाधान बडगुजर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

बोदवड शहरातील एका विक्रेत्याला मुळव्याध झाला होता. मुळव्याधीवर उपचार करण्यासाठी या विक्रेत्याने बोदवड येथील समछाया हॉस्पिटल येथे जावून यशपाल समाधान बडगुजर या कथित डॉक्टरची भेट घेतली होती. सन 2022 मधे या विक्रेत्याने या कथित डॉक्टरकडून मुळव्याधीचे ऑपरेशन केले.

मुळव्याधीचे ऑपरेशन करतांना कथित डॉक्टर यशपाल याने रुग्णाच्या गुदद्वाराच्या जागी इंजेक्शन देऊन प्रमाणापेक्षा अधिक जागेची चिरफाड केली. याचा परिणाम रुग्णास गुदद्वाराचा कर्करोग झाला. ऑपरेशनचे पुरेसे ज्ञान नसतांना निष्काळजीपणे धारदार शस्त्राने चिरफाड करुन जीव धोक्यात आणल्याप्रकरणी यशपाल बडगुजर याच्याविरुद्ध रुग्णाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत रुग्णाने कथित डॉक्टरला विचारपुस केली असता त्याने आपणास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अंकुश जाधव करत आहेत.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here